कुडाळ : काही दिवसांपासून माजी शिक्षणमंत्री व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण खरे कारण सांगताना मी नाराज नसून, आजारपणामुळे सभेला उपस्थित राहिलो नाही, यानंतर निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नाही असे सांगत शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, नुकतेच कुडाळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर आभार सभा झाली. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या आभार सभेचे आयोजन केले होते. पण याला माजी शालेय शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर उपस्थित नव्हते.
आता प्रकृती ठीक झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागले असून सावंतवाडी मतदारसंघात १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. मात्र याच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. दीपक केसरकर यांनी याआधीच आपल्या राजकीय नाराजीच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना सर्व चर्चा धुडकावून लावल्या होत्या. तर मी नाराज नाही, मागील अडीच वर्षे मी मंत्रिपदी होतो. त्यात मी खुश आहे. मला काम करण्यासाठी आमदारकीही पुरेशी आहे. इतरांनाही संधी मिळायला हवी. आता माझं वय वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात कुणीतरी उठून बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपणच आधीच बाजूला झालेले चांगले, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर कुडाळमध्ये झालेल्या सभेला ते उपस्थित नसल्याने जास्तच चर्चा रंगल्या होत्या.
पण मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा त्रास त्यांना जाणवत होता. ज्यामुळे त्यांचे ‘बायपास’ ऑपरेशन करण्यात आले होते. प्रकृती ठीक झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागले असून सावंतवाडी मतदारसंघात १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. मात्र याच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता शिवसेनेत खळबळ उडाली असून त्यांनी असा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे. केसरकर यांनी, राजकारण हे निवडणुकांपुरतं असते. पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असे म्हणत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
तसेच केसरकर यांनी केवळ जनतेची सेवा करणे हेच माझे कर्तव्य समजतो. याच जनतेच्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वी मला पुनर्जन्म मिळाला. त्यामुळे माझे हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करत असल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग दिनाच्या औचित्याने रुग्णांच्या सेवेसाठी केसरकरांच्या हस्ते १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले.