सातारा : प्रतिनिधी
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जून महिना संपण्याच्या आधीच कोयना धरण निम्मे भरत आले आहे. अजून पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा महापुराची धास्ती वाढली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवून पाणीपातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात प्रति सेकंद १८,६३४ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ४४ टीएमसी झाला आहे. २४ तासांत पाणीसाठ्यात दीड टीएमसीहून अधिक वाढ झाली आहे.
दरम्यान, पुढील चार दिवस सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊ शकते.