कोर्टाकडे वेळ नाही!

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेल्या टिप्पणीची मोठी चर्चा सुरू आहे. ‘आमचा वेळ वाया घालवू नका आणि स्वत:चाही वेळ वाया घालवू नका. लाठीमाराचे व्हीडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही’ अशा शब्दांत त्यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सुनावले. ‘कॉक्रोच जनता पार्टीच्या’वतीने काढण्यात आलेल्या संसद मोर्चा दरम्यान पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करत अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, विद्यार्थी नीट परीक्षा, नॅशनल टेस्टिंग एजन्सीतील सुधारणा आणि पेपरफुटी यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर आंदोलन करत आहेत.

पोलिसांच्या कथित क्रूरतेचे व्हीडीओ देखील आहेत. शक्य असल्यास या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करावी. त्यानंतर वकिलांनी पोलिस अत्याचाराचे व्हीडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला असता, सरन्यायाधीशांनी त्यात रस नसल्याचे स्पष्ट करत सुनावणी तातडीने घेण्यास नकार दिला. दिल्लीमध्ये विद्यार्थी व तरुण आंदोलकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिस व निमलष्करी दलाच्या जवानांकडून लाठीमार करण्यात आला. या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. बुधवारी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जंतरमंतरवर आधीच निदर्शने सुरू आहेत आणि पोलिस तिथे अत्यंत कठोर कारवाई करत आहेत. आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर करण्यात आला,

असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने खंडपीठाला सांगितले. यावर सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले, ‘आमचा आणि तुमचा वेळ वाया घालू नका. तुमचा वेळ आमच्या वेळेपेक्षाही अधिक मौल्यवान आहे.’ त्यानंतरही याचिकाकर्त्यांच्या वकिलाने आपला युक्तिवाद सुरूच ठेवला. विद्यार्थी तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या करत आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना पोलिसांच्या क्रूरतेचा सामना करावा लागत आहे. माझ्याकडे त्यासंबंधी चित्रफिती आहेत. परवानगी मिळाल्यास त्या दाखवू इच्छितो, असे या वकिलाने सांगितले. त्यावर, आम्हाला चित्रफिती पाहण्यात रस नाही. ते पाहण्यासाठी वेळ नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले. खरे पाहता, सर्वोच्च न्यायालयासमोर कामाचा डोंगर असतो, अनेक प्रकरणे त्यांना हाताळायची असतात. त्यामुळे लाठीमारासारख्या फालतू चित्रफिती पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो हे त्या वकिलाला कळावयास हवे होते. दरम्यान, दिल्लीत आंदोलकांवर पोलिसांकडून आणि बळाचा वापर केल्याचा आरोप करणा-या दोन याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि शहर पोलिसांकडून उत्तर मागवले. न्

यायालयाने संबंधित अधिका-यांना पोलिस कारवाईशी संबंधित सर्व नोंदी (सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि चित्रफिती) सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ असा की, दिल्ली उच्च न्यायालयाकडे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि चित्रफिती पाहण्यास वेळच वेळ आहे! न्यायालयाने या याचिकांवर केंद्र सरकार आणि पोलिसांना नोटीस जारी केली आणि चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता आणखी एक प्रकरण बघा. वाढते वय, मूत्रपिंडाचा आजार आणि इतर व्याधींचा हवाला देत डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयातील डॉॅक्टर, परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याने बुधवारी उच्च न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली. त्यावर सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेल्या हल्ल्याचा न्यायालयाने संदर्भ दिला व डॉक्टरांवर हल्ला करताना आरोपी उत्साही दिसत होता, असा टोला लगावला. ७३ वर्षांचे म्हात्रे डॉक्टरांना मारहाण करताना २५ वर्षांचे दिसत होते असे न्यायालय म्हणाले. म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी न्यायालयाकडे वेळ होता! थोडक्यात काय तर, छोट्यांचे छोटे आणि मोठ्यांचे मोठेच असते हे सर्वसामान्यांच्या लक्षात यायला हवे! म्हात्रेच्या जामिनावरील स्थगिती प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठाने कायम ठेवली.

याशिवाय, मारहाण झालेल्या महानगरपालिकेच्या आणि म्हात्रे दाखल होता त्या ठाणे शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करून सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. पुढील सुनावणीदरम्यान हे चित्रीकरण न्यायालयाकडून पाहिले जाण्याची शक्यता आहे, असे न्यायालयाने नमूद केले. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरून संसदेत आणि संसदेबाहेर घमासान सुरू असताना, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील कार्यालयात भेट घेतली. केंद्र सरकार राजकीयदृष्ट्या अडचणीत आले असतानाच दोन नेत्यांच्या भेटीमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. जंतरमंतरवर जाऊन शरद पवार यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके याची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पवार व मोदी यांच्यामध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news