22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरखेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते

खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते

लातूर : प्रतिनिधी
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांमधून अधिकारी व कर्मचारी एकत्रित आल्याने सांघिक भावना वाढीस लागते. त्यामुळे शासनाने दिलेले प्रत्येक उद्दिष्ट सांघिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होत असलेल्या जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, कार्यकारी अभियंता संदिप देशपांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी व  जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दैनंदिन कामकाज करताना अधिकारी-कर्मचा-यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं, यासाठी एखादा आवडीचा खेळ खेळायला हवा असे सांगून जिल्हाधिकारी घुगे म्हणाल्या की, निरोगी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली खेळ असून महिन्याला मिळणा-या पगारापेक्षा खेळातून मिळणारा आनंद जास्त असल्याचे त्या म्हणाल्या.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सागर म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी खेळाचा आनंद घ्यावा. कर्मचा-यांनी मनावरचा ताण कमी करुन खेळाचा आनंद घ्यावा, शारिरीक क्षमतांचा विकास करुन आणि आरोग्य सुदृड राहण्याचे दृष्टीने आनंदाने खेळात रममाण व्हा असा सल्ला दिला. या मैदानी खेळामुळे स्फुर्ती येते, शरिराचा चांगला व्यायाम होतो व वर्षभर त्याची स्फुर्ती मिळते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ म्हणाले की, सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठीचा दिवस क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात सर्वानी सहभागी व्हावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवादतज्ञ उध्दव बापु फड यांनी केले. तर आभार अतिरिक्त मुख्य  कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR