बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक खळबळजक प्रकार उघडकीस आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने हा प्राणघातक हल्ला केला आहे. अज्ञात टोळक्यांनी केलेल्या भीषण अपघातात चार महिला गंभीर जखमी झाले आहेत. तर, एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सध्या खोक्या भोसलेच्या कुटुंबातील सदस्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
ही धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यातील तहसील कार्यालयासमोरील गायरान परिसरात घडली. मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. गायरान परिसरात १० ते १५ जणांची टोळी पारधी वस्तीवर आली. अज्ञात टोळक्यांनी मिळून खोक्या भोसलेच्या कुटुंबावर हल्ला चढवला.
अज्ञात टोळक्यांनी कोयते, दांडके आणि कु-हाडीने वार केले. या भीषण हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. अज्ञात टोळक्यांनी विशेषत: खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर हल्ला चढवला. अमानुष हल्ला चढवल्यानंतर पीडित महिलांनी शिरूर पोलील ठाणे गाठले.
शिरूर पोलीस ठाणे गाठत त्यांनी अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. सध्या जखमी महिलांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ‘अनेक वेळा सांगूनही या जागेवर का राहता?’, असा प्रश्न उपस्थित करत अज्ञात हल्लेखोरांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर हल्ला केला. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.