28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरगांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ तासांच्या आत दुसरा खुन

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ तासांच्या आत दुसरा खुन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील वर्दळीचे ठिकाण असेलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन मंगळवारी रात्री तिघांकडून दोघांवर चाकूने वारकेल्याची व त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास ही उलटून गेले नाहीत तोवरच व या गुन्ह्यातील आरापीला तात्काळ गजाआड केल्याचा पोलीसांकडून उदो..उदो सुरू असतानाच बुधवारी रात्री ८ च्या सुमारास गंजगोलाई परिसरातील लोखंडगल्लीत तिक्ष्ण हत्याराने एकाचा गळा चिरुन खुन करण्यात आल्याची घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत गांधी चौक पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.
मंगळवार दि. ८ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वर्दळीचे ठिकाण असेलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन तिघांकडून दोघांवर चाकूने वार केल्याची व त्यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलीसांकडून तात्काळ गजाआड केल्याचा उदो..उदो… सुरु असताना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लातूरच्या गंजगोलाई परीसरातील लोखंडगल्लीत पैगंबर हजीमलंग सय्यद व्यवसाय मजुरी रा. बाभळगाव ह. मु. अंजलीनगर या तरुणाचा एकाने तीक्ष्ण हत्याराने गळा चिरल्याची घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गांधी चौक पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्याची व मारेक-याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु होती.
मित्रानेच गळा चिरल्याची चर्चा!
मित्रानेच पैगंबर हजीमलंग सय्यद याचा गळा चिरल्याची चर्चा घटनास्थळी व रुग्णालय परिसरात सुरु होती. गळा चिरणा-या त्या व्यक्तीचे नाव सुलतान असल्याचे बोलले जात होते. नेमक्या कोणत्या कारणातून सदरील खुनाची घटना घडली याचा पोलीसांकडून शोध घेतला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR