लातूर : प्रतिनिधी
गुजरात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील महाविद्यालयाच्या गुणवत्तेत अधिकाधिक सुधार व्हावी, या उद्देशाने देशातील उच्च गुणवत्ताधारक महाविद्यालयांना भेटी देण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्या परिपञकानुसार शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक प्राप्त दयानंद विज्ञान महाविद्यालयाची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. गुजरातमधील भेसन येथील शासकीय कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद मयेत्रा, नॅक समन्वयक डॉ. पंकज सोलंकी, डॉ. विश्वजीत कावा, डॉ. हार्दिक राजगुरू या शिष्टमंडळाने दयानंद शिक्षण संस्था व दयानंद विज्ञान महाविद्यालयास भेट दिली
.
या त्यांच्या भेटी अभ्यास दौ-यादरम्यान दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, शैक्षणिक विकास अधिकारी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्याशी गुणवत्ता वाढीबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य,आयक्यूएसी समन्वयक, विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आयक्यूएसी व विद्यार्थी, प्राध्यापक यांचे गुणोत्तर प्रमाण, नॅकची पूर्वतयारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी याविषयी प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी पीपीटी प्रेझेंटेशन केले. आयक्यूएसी विभाग, महाविद्यालयाचे कार्यालयीन कामकाज व महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये त्यांनी भेट दिली व महाविद्यालयाचे सुसज्ज ग्रंथालय, मुलां व मुलींचे वसतीगृह, एनएसएस, एनसीसी विभाग, संस्थेचा सुसज्य परिसर, क्रिकेटचे भव्य मैदान, इंडोर स्टेडियम अशा विविधांगी ठिकाणी त्यांनी भेट दिली.
…………………….३…………………..