लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी खरीप हंगाम महत्वाचा आहे. यावर्षी पाऊस वेळेवर पडल्याने सर्व शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. खरीपासाठी शेतक-यांना चांगले खत व बियाणे मिळावीत, बोगस बियाणे आणि खते रोखून शेतक-यांना आवश्यक दर्जेदार बियाणे आणि खतांची उपलब्धता करावी, खरीपातील सोयाबीन आणि इतर पिकावरील शंखी गोगलगाय, पिवळा मोझॅक आणि तुरीवरील मर रोग यांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, तसेच गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकवीमा शेतक-यांना देण्यात यावा या मागणीचे निवेदन लातूर लोकसभेचे खासदार शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या नेतृत्वाखाली लातुर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १३ जून रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना देण्यात आले.
खरीप हंगाम सुरु होत असतांना शेतक-यांकडून खते, बियाणेचा दर्जा, उपलब्धता या बाबत तक्रारी येऊ लागल्या. पेरणी सुरु असतांनाच खरीपातील सोयाबीन आणि इतर पिकावरील शंखी गोगलगाय, पिवळा मोझॅक आणि तुरीवरील मर रोग नियंत्रणासाठी उपायाची आवश्यकता दिसू लागली. तसेच गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकवीमा शेतक-यांना अद्याप मिळाला नाही. याअनुषंगाने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सदरीलबाबत जिल्हाधीकारी यांना निवेदन दयावे, अशी सुचना काँग्रेस कमिटीला देण्यात आली. या अनुषंगाने
लातूर लोकसभेचे खासदार शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या नेतृत्वाखाली लातुर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना गुरुवार निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत लातुर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. किरण जाधव, प्रदेश सचिव अभय सांळूके, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. उदय गवारे, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, अॅड. बाबासाहेब गायकवाड, डॉ. अरविंद भाताब्रे, सुपर्ण जगताप, रमेश सुर्यवंशी, प्रविण सुर्यवंशी, इम्रान सय्यद, मारुती पांडे, प्रा. प्रविण कांबळे, प्रा. राजकूमार जाधव, अॅड. देविदास बोरुळे पाटील, अॅड. प्रविण पाटील, शिवाजी कांबळे, अभिजीत इगे, शरद देशमुख, मुकेश राजेमाने, राम स्वामी, सोनू डगवाले, प्रा. एम. पी. देशमुख, नागसेन कामेगावकर, सुलेखा कारेपूरकर, दत्ता सोमवंशी, अब्दूला शेख, असिफ बागवान, विजय टाकेकर आदी उपस्थित होते.