भंडारा : प्रतिनिधी
राज्यात विधानसभेसाठी सर्वत्र मतदान होत असतांना भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघात गोवारी समाजाने मतदानावर बहिष्कार करून प्रशासनावर नाराजी दर्शवली.
गोवारी समाज बांधवांच्या समस्या सोडविण्यात शासन-प्रशासनाची उदासिनता असल्याने साकोली मतदारसंघातील बहुतांश गावात मतदानावर बहिष्कार घातला आहे. साकोली मतदारसंघात बहुसंख्य गोवारी समाज बांधव आहेत. समाजाच्या संघटनांनी मतदान करण्यावर बहिष्कार टाकल्यामुळे केसलवाडा वाघ, एकोडीसह बहुसंख्य गोवारी समाज बांधवांनी मतदान करण्यापासून आपल्याला वेगळे ठेवलेले आहे. आतापर्यंत या समाजातील एकही मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत.
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील हाय-प्रोफाइल जागांपैकी एक आहे आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होत आहे.