सोलापूर – प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अर्थात् वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान , फोंडा, गोवा येथे संपन्न होणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिलहा समन्वयक राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस तुळजापूर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष . किशोर गंगणे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष . बापू ढगे, अक्कलकोट प्रज्ञापीठचे अध्यक्ष. प्रसाद पंडित, भाजपचे माजी नगरसेवक . चंद्रकांत रमणशेट्टी, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक . सत्यनारायण गुर्रम, पूर्वभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे हेही उपस्थित होते.
या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, घाना, नेपाल आणि बांग्लादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगढ येथील शदाणी दरबारचे डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आदी संतांची उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.याशिवाय प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका चे कार्याध्यक्ष . रणजीत सावरकर, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, हिंदु इकोसिस्टिम चे संस्थापक . कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा सेव कल्चर सेव भारत चे संस्थापक . उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.