21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केली बातचीत

ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केली बातचीत

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद व विविध संस्था अंतर्गत चालवल्या जाणा-या  शाळांमधील शिक्षक खुप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या अनुषंगाने विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी सामाजिक भावनेतून काय अधिक चांगले कार्य करता येईल याविषयी रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर  यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, इंग्रजी भाषाज्ञान व्हावे, व्यक्त्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमाला लातूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.  शालेय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या ‘रीड लातूर’ या पुस्तक वाचन उपक्रमाचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी कौतुक केले. सध्याच्या काळात पुस्तक वाचन करणे ही गरज बनली आहे.  पुस्तक वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रत्येक कुटूंबात पुस्तके वाचनाच्या दृष्टीने विचार होवून त्यातून लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी चालना मिळेल अशा भावना त्यांनी व्यक्त्त केल्या. आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमास खुप चांगला प्रतिसाद मिळत असून इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भिती दूर होवून मोठ्या आत्मविश्वासाने विद्यार्थी इंग्रजी पुस्तकांचे वाचन करत आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने सुरु असलेला ‘रीड लातूर’ उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्त्तीमत्व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ‘रीड लातूर’च्या संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी सांगितले. यावेळी ‘रीड लातूर’ उपक्रमाचे समन्वयक राजू सी. पाटील यांनी ‘रीड लातूर’च्या आजपर्यंतच्या  वाटचालीची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करुन दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR