22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रचाकणकर यांनी केली ईव्हीएम मशिनची पूजा; दाखल झाला गुन्हा

चाकणकर यांनी केली ईव्हीएम मशिनची पूजा; दाखल झाला गुन्हा

बारामती : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशिनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. निवडणूक अधिका-यानेच त्यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर हे प्रकरण शेकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आला आहे. या मतदारसंघात आज सकाळपासून मोठमोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांचा ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग गाजला. तर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. राजकीय वातावरण अशा प्रकारे ढवळून निघत असतानाच आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशिनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे.

खडकवासला परिसरातील घटना
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहोचल्या. मतदान सुरू होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनची पूजा केली.

निवडणूक अधिकारी चक्रावले
मतदानासाठी चाकणकर या ताट आणि दिवा कशाला घेऊन आल्या असतील असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता. मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले होते. पण चाकणकरांनी ईव्हीएमची पूजा करताच अधिकारी अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिका-यानेच याप्रकरणी तक्रार दिली. चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR