36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसांगोल्यात ईव्हीएम मशिन पेटवली

सांगोल्यात ईव्हीएम मशिन पेटवली

सांगोला : तालुक्यात मतदाराकडून मतदान मशिन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. मतदान मशिन पेटवण्याचा प्रयत्न करणा-या संबंधित तरुणाला अधिका-यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार करणा-या संबंधित तरुणाकडून ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.

इतकेच नाहीतर मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान मशिन बोगस असल्याचा आरोपही त्या तरुणाने केला. यावेळी तरुणाने मतदानाच्या मशिनवर पेट्रोल टाकून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिका-यांनी वेळीच धाव घेत हा धक्कादायक प्रकार रोखला आणि त्या तरुणाला पोलिसांच्या हवाली केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान पार पडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR