38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरचार दिवसांत तीन टँकर वाढले

चार दिवसांत तीन टँकर वाढले

लातूर : प्रतिनिधी
चैत्र महिण्याच्या अखेरीस तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअस पर्यंत वाढल्याने वाढत्या उन्हामुळे नागरीकांना उन्हाचा झळा असाहय्य होत आहेत. या वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी झपाटयाने खालावत आहे. गेल्या चार दिवसात नविन तीन टँकर वाढले आहेत. आज घडीला जिल्हयातील १६ गावे व ४ वाडया, तांडयावर १९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र वाढतया तापमानाचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीसाठयावर होताना दिसून येत आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी जानेवारीपासूनच ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. चैत्र महिण्याच्या अखेरीसही पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. या वाढत्या उन्हामुळे नद्या, नाले, विहिरी कोरडया पडत आहेत. त्यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. ग्रामीण भागात नागरीकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्हयातील ३३ गावे व १९ वाडया, तांडयावरून ५१ टँकरची मागणी पंचायत समिती स्तरावर केली आहे. पंचायत समिती स्तरावरून आलेल्या प्रस्तावांची पाहणी करून १९ गावे व ४ वाडयांचे प्रस्ताव तहसील कार्यालय स्तरावर पाठवले होते. तहसील कार्यालयाने १६ गावे व ४ वाडयांसाठी १९ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. यात औसा तालुक्यातील लामजाना, खरोसा, टाका व मोगरगा, तांबारवाडी, राजेवाडी, शिवणी लखवाडी, रामेगाव, मासूर्डी, अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, ब्रम्हवाडी (सिंदगी बु.), जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, वाघमारी तांडा, तसेच लातूर तालुक्यातील बोरगाव, साखरा, चिंचोली ब., चिकूर्डा, गुंफावाडी, रामेगाव येथे टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR