27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनआदित्य रॉय कपूर-अनन्या पांडेचे ब्रेकअप?

आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडेचे ब्रेकअप?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे जवळपास एक महिन्यापूर्वी ब्रेकअप झाले आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने त्यांच्या मित्रांनाही धक्का बसला आहे. दोन्ही स्टार्सच्या एका जवळच्या मित्राने अलीकडेच सांगितले की, एक महिन्यापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले आहे.

एका मुलाखतीदरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या एका मित्राने सांगितले की, दोघांचे एक महिन्यापूर्वी ब्रेकअप झाले आहे. त्यांच्या ब्रेकअपमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला. अनन्या या प्रकरणातून सावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असून, आता ती तिच्या नवीन मित्रासोबत वेळ घालवत आहे. तर आदित्यही परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे, असे या दोघांच्या मित्राने सांगितले. आदित्य आणि अनन्या जवळपास दोन वर्षांपासून डेट करत होते. मात्र, या दोघांनी कधीही अधिकृतपणे खुलासा केला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR