Homeधाराशिवचिकणी तांडा येथे मुलाकडून वडीलांचा दगड डोक्यात घालून खून

चिकणी तांडा येथे मुलाकडून वडीलांचा दगड डोक्यात घालून खून

दुसऱ्या लग्नासह पहिल्या पत्नीच्या ऑपरेशन केल्याचे कारण, आरोपी मुलावर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
दुसरे लग्न केले तसेच पहिल्या पत्नी चे कुटुंब नियोजन ऑपरेशन केले नाही या कारणावरून जन्मदात्या वडीलांचा डोक्यात दगड घालून खून केला. हि खळबळजनक घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात चि कणी तांडा येथील शेतात शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली . याप्रकरणी आरोपी मुलावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

याबाबत नळदुर्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी धुळप्पा महिपती सुरवसे रा. मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. १६ जानेवारी रोजी५.३० वा. सु.पुर्वी अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात मयत महिपती आंबाजी सुरवसे, वय ४५ वर्षे, रा.मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना आरोपीने दुसरे लग्न केले व पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही या करणावरुन दगड डोक्यात घालून जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे, वय ७० वर्षे, रा. मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR