26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरचिचोंडी येथे सात लाख २१ हजारांची चोरट्यांकडून घरफोडी

चिचोंडी येथे सात लाख २१ हजारांची चोरट्यांकडून घरफोडी

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील चिचोंडी येथील सतीश रंगराव कोनीरे यांचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचे तसेच रोख रक्कम ३ लाख ८ हजार ५०० रुपये असा एकूण ७ लाख २१०००  रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
निलंगा तालुक्यातील चिचोंडी येथील सतीश रंगराव कोनीरे यांच्या राहत्या घराचे दि ४ जुलै ते ५ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मेन गेटला लावलेले कुलूप तोडुन आतमध्ये प्रवेश करून लोखंडी पेट्यामध्ये व धान्यपेटयामध्ये ठेवलेले ७५ ग्रॅमचे सोन्याचे दागीने जुने वापरते किंमत प्रति तोळा ५५ हजार रुपये असे एकूण किंमत ४,१२,५०० रुपये व रोख रक्कम २,८्र९,५०० रुपये असे एकूण ७,२,००० रुपयांचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम तसेच माझे घराजवळील प्रशांत मोहन बोयणे याचे रोख रक्कम १९,०००  रुपये असे एकूण ७,२१,००० रुपयांचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरुन नेले. या प्रकरणी सतिष रंगराव कोनिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औराद शहाजनी पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्या विरोधात कलम – २१७/२०२५ कलम ३०५,३३१ (४) भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनी विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR