22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeचीन, इराणला पाकिस्तानची तालिबान विरोधात चिथावणी

चीन, इराणला पाकिस्तानची तालिबान विरोधात चिथावणी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकार समोर सातत्याने नामुष्की ओढवणा-या पाकिस्ताननं आता चीन आणि इराणला भडकवणे सुरू केले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी ना केवळ पाकिस्तानसाठी तर चीन आणि इराणसाठीही धोकादायक आहेत. तालिबानने अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. तालिबानने टीटीपी दहशतवाद्यांविरोधात सक्त पाऊले उचलावी, जे पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे राजदूत आसिफ दुर्रानी म्हणाले की, अफगाणिस्तानच्या धरतीवरील दहशतवादी फक्त पाकिस्तान नव्हे तर चीन, इराण, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तानसाठीही च्ािंतेचा विषय आहे.

पाकिस्तानी सरकारने टीटीपी दहशतवाद्यांविरोधात सैन्य अभियान सुरू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानात परिस्थितीत चिघळली आहे. खैबूर प्रांतातील पश्तून इथं जनता रस्त्यावर उतरली आहे. बन्नू येथेही जोरदार विरोध प्रदर्शन होत आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानातून लाखोच्या संख्येने राहणा-या अफगाणी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं जात आहे.

तालिबानी सरकार आल्यापासून देशात पर्यटकांची संख्या वाढली आहे. २०२१ ते २०२३ या काळात अफगाणिस्तानातील पर्यटन १० पटीने वाढले आहे. यात चीनी पर्यटकांची संख्या जास्त असल्याने शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अफगाणिस्तानातील वाढत्या पर्यटनामुळे पाकिस्तान सरकारवर विरोधकांकडून टीका सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR