24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरचोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्न; एकास अटक

चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्न; एकास अटक

लातूर : प्रतिनिधी
चोरलेले सोन्याचे दागिने  विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींची माहीती पोलीस पथकाला मिळाली चोरलेले सोन्याचे दागिने  विकण्याच्या प्रयत्नात असलेला भरत इंद्रजीत कदम, वय २७ वर्ष, राहणार पवारनगर,औसा यास दि. ८ जानेवारी रोजी औसा रोड परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने, दि. ७ जानेवारी रोजी पवारनगर, औसा येथील घरातून चोरी केली आहे असे सांगीतले. त्यावरुन औसा पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे औसा येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. नमूद आरोपीने वर गुन्ह्यात   चोरलेली सोन्याची १५ ग्रॅम  वजनाची एक पाटली ९० हजाररूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस पोलीस अमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR