छत्रपती संभाजीनगरमध्ये शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचे स्मारक उभारावे

मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत ठराव, प्रदेशाध्यक्षांना पत्र
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्याच्या विकासासाठी अनमोल योगदान दिलेले जलक्रांतीचे जनक स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मराठवाड्याच्या राजधानीत भव्य स्मारक व्हावे, या मागणीसाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ठराव घेण्यासंबंधीचे पत्र दिले. त्यानुसार प्रदेशाध्यक्षांनी या दोन्ही नेत्यांचे स्मारक उभारण्याच्या ठरावास मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत मंगळवारी मान्यता दिली.

डॉ. रेखाताई चव्हाण, अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर, प्रकाश भगनुरे पाटील, संजय वाघमारे, दीपकसिंग हुजुरिया, प्रवीण केदार, शांतीलाल पवार, प्रमोद सोनवणे यांनी स्मारक उभारण्यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे पत्र देऊन ठराव घेण्यासंबंधी विनंती केली. त्यास प्रदेशाध्यक्षांनी होकार दिला. शंकरराव चव्हाण यांना आपल्यातून जाऊन २२ वर्षे झाली आहेत तर विलासराव देशमुख यांचे अकाली निधन होऊन १४ वर्षे झाली आहेत. या दोन्ही नेत्यांनी मराठवाड्याच्या व महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या राजधानीत या दोन्ही नेत्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मराठवाड्यातील नेते व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या स्मारकाच्या माध्यमातून या नेत्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणा देईल. त्यामुळे शंकरराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून स्मारक उभारण्याविषयीची मागणी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरातील दूध डेअरीच्या परिसरात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. त्यांच्या शेजारीच शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांचे स्मारक व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कडक शिस्तीचे भोक्ते असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री, केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री, अर्थमंत्री, नियोजन आयोगाचे अध्यक्षपद, अशी पदे भूषविली आहेत. विकासरत्न विलासराव देशमुख यांचा ग्रामपंचायतच्या राजकारणापासून थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत प्रवास राहिलेला आहे. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद आणि महाराष्ट्रात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांचे मराठवाड्याच्या राजधानीत स्मारक व्हावे, म्हणून काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news