छ. संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भांडणा-या आणि स्वबळावर ५७ नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर, उपमहापौरपदासह सर्वच पदांवर दावा सांगणा-या भाजपने अखेर बहुमतासाठी शिवसेनेला सोबत घेतले आहे. भाजपचा महापौर कोण यासाठी डझनभर इच्छुकांपैकी २ नावे भाजपाच्या प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली होती. यात समीर राजूरकर आणि अनिल मकरी यांच्या नावाचा समावेश होता. आज प्रदेश समितीने महापौरपदासाठी समीर राजूरकर यांचे नाव निश्चित केले आहे. तर उपमहापौर पदावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत ३३ नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाला रोखण्यासाठी भाजप-शिवसेनेने समीर राजूरकर, राजेंद्र जंजाळ यांच्या रूपाने आक्रमक आणि तरुण चेहरे दिले आहेत. समीर राजूरकर हे भाजपचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. समर्थनगर प्रभागातून ते निवडून आले आहेत.

प्रशासन आणि शासकीय योजना यांची इत्थंभूत माहिती आणि अभ्यास असणा-या समीर राजूरकर यांची महापौरपदी निवड करत भाजपने मोठी खेळी केली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत अनेक नावे असताना समीर राजूरकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. कोअर कमिटीतील सदस्य मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे या सर्वांच्या सहमतीनंतर प्रदेश समितीने समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news