जरांगे यांनी २ वर्षे क्लिप का लपवून ठेवली?

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप ही आजची नसून तब्बल २ ते २.५ वर्षांपूर्वीची, म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२४ ची आहे. या काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित संभाषणाची ३१ ते ३२ मिनिटांची ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर, शिवसेना नेते रामदास कदम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या क्लिपमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या संपूर्ण प्रकरणाच्या लेखी चौकशीची मागणी सरकारकडे जाहीर केली.

जरांगे यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपच्या कालखंडावर बोट ठेवत रामदास कदम म्हणाले, जरांगे पाटील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत, यात शंका नाही. मात्र, आज त्यांनी दाखवलेली क्लिप ही १४ ऑक्टोबर २०२४ ची आहे. २०२४, २०२५ आणि २०२६ अशी २ ते २.५ वर्षे ही क्लिप स्वत:जवळ का ठेवली? या काळात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जर एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी ३ ते ४ लोक कॉन्फरन्स कॉलवर बोलत होते, तर आपल्याच समाजाच्या नेत्याची बदनामी रोखण्यासाठी जरांगेंनी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते.

विनोद पाटलांना विचारून घ्या
मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासाठी सर्व कायदेशीर अभ्यास कोणाच्या बंगल्यावर बसून झाला, हे जरांगेंनी समन्वयक विनोद पाटील यांना विचारून घ्यावे. आम्ही नेहमी पडद्याआडून समाजासाठी काम केले आहे. असे असताना शिंदे साहेबांवर संशय घेणे चुकीचे आहे.

शिंदेंना ‘चमचे’ म्हणालात; माझ्याकडे पुरावे
मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर राजकीय आरोप करताना कदम यांनी गौप्यस्फोट केला. माझ्याकडेही एक अत्यंत स्फोटक पुरावा आहे. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या एका गुप्त बैठकीत भाजपचे एक आमदार उपस्थित होते. त्या बैठकीत जरांगे स्वत: म्हणाले की, या बैठकीत निम्मेपेक्षा जास्त एकनाथ शिंदेंचे चमचे बसले आहेत. मी हवेत तलवारी चालवणारा नेता नाही, अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. त्या बैठकीत उपस्थित असणारे मराठा समाजाचे इंगळे नावाचे गृहस्थ ताडकन उभे राहिले आणि त्यांनी जरांगेंना ‘हे बोलणे योग्य नाही’ असे तोंडावर सुनावले होते.

भाजपच्या आमदाराला सोबत घेऊन एकनाथ शिंदेंना संपवण्याचे कारस्थान कोण करत आहे? कु-हाडीचा दांडा गोत्यास काळ याप्रमाणे एका मराठा नेत्यानेच दुस-या मराठा नेत्याला संपवायची ही सुपारी घेतली आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनाही स्वकीयांशी लढावे लागले होते, तशीच फूट समाजात पाडण्याचे काम जरांगे करत आहेत का? असा थेट सवाल कदम यांनी विचारला.

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी करत रामदास कदम म्हणाले, मी ती संपूर्ण ३२ मिनिटांची क्लिप ऐकली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि मुंबईचे काही स्थानिक लोक कॉन्फरन्सवर बोलत आहेत. त्यामध्ये भाजपचा कोणताही वरिष्ठ किंवा मोठा नेता नाही. ती डॉक्टर म्हणून बोलणारी महिला कोण आहे? ती कुठून बोलत होती? तिने पैसे कुठे दिले? या सर्व बाबींचा छडा लागला पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33
Video thumbnail
Vijayadashami 2026|बाभळगावात धीरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक अश्वपूजन
01:41
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
44:57

Latest news