जर्सी तेरा रंग कैसा?

सध्या ‘हॉकी इंडिया’मध्ये ‘जर्सी वाद’ पराकोटीला पोहोचला आहे. भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलण्यावरून ‘हॉकी इंडिया’मध्ये सुरू झालेला अंतर्गत वाद मंगळवारी अधिक तीव्र झाला. जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिलेली मुदत कार्यकारी संचालक कमांडर आर. के. श्रीवास्तव यांनी पाळली नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विचारविनिमय करण्यासाठी सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी कार्यकारी मंडळाची (ईबी) तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. तिर्की यांनी श्रीवास्तव यांना कडक ई-मेलमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी श्रीवास्तव यांनी कार्यकारी मंडळाला दिलेले स्पष्टीकरण अपुरे असल्याचे सांगत तिर्की यांनी पुरावे सादर करण्याचे निर्देश कायम असल्याचे स्पष्ट केले.

मात्र, दिलेल्या मुदतीत श्रीवास्तव यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुदत संपल्यानंतर लगेचच सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी तिर्की यांना पत्र लिहून सर्व प्रलंबित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली. १५ ऑगस्टपासून सुरू होणा-या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकापूर्वी हा वाद उफाळून आला आहे. भारताचे माजी कर्णधार वीरेन रस्किन्हा, अजितपाल सिंह, धनराज पिल्ले आणि परगट सिंह यांनी जर्सीचा पारंपरिक रंग बदलण्यावर आक्षेप घेतला आहे. निळ्या टर्फवर खेळताना खेळाडूंची दृश्यमानता वाढविण्यासाठी हा बदल केल्याचा दावा ‘हॉकी इंडिया’ने केला असला, तरी हा निर्णय अध्यक्ष किंवा कार्यकारी मंडळाच्या मंजुरीशिवाय घेण्यात आल्याचे तिर्की यांचे म्हणणे आहे. जर्सीच्या वादाव्यतिरिक्त तिर्की यांनी एका अधिका-याविरोधातील लैंगिक छळाच्या तक्रारींचा पूर्ण चौकशी अहवालही मागवला आहे. तक्रार निवारण समितीची रचना, सदस्यांची पात्रता आणि बैठकांचे स्वाक्षरी केलेले इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश तिर्की यांनी दिले होते. एप्रिल महिन्यात आलेल्या अनामिक तक्रारीनंतर अनेक महिला खेळाडू आणि अधिका-यांनी या आरोपाला दुजोरा दिला होता. मे महिन्यात तिर्की यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती आणि जूनमध्ये समिती स्थापन करण्यावर चर्चा झाली होती. परंतु अद्याप कोणतीही समिती स्थापन झालेली नाही.

पुरुष हॉकी विश्वकप २०२६ च्या तोंडावर भारतीय हॉकी वर्तुळातून अत्यंत मोठी आणि वादग्रस्त बातमी समोर आली आहे. भारतीय हॉकी संघाची जागतिक स्तरावर ओळख असणारी पारंपरिक ‘निळी’ (ब्लू) जर्सी बदलून आता ती पूर्णपणे ‘भगवी’(ऑरेंज) करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून (ट्विटर/एक्स) भारतीय संघाची ही नवीन भगवी जर्सी जाहीर करताच क्रीडापे्रमी आणि राजकीय नेत्यांकडून त्यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्किन्हा याने या निर्णयावर थेट शब्दांत ताशेरे ओढले असून, काँग्रेस पक्षानेही यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. हॉकी विश्वचषक २०२६चे आयोजन ऑगस्ट महिन्यात बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही राष्ट्रीय संघांसाठी ही नवीन भगवी जर्सी बाजारात आणली. जर्सीचा रंग बदलल्याचे समजताच रस्किन्हाने सोशल मीडियावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, हॉकी इंडियाने गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकीच्या विकासासाठी निश्चितच कौतुकास्पद काम केले आहे

पण जर्सीचा मूळ रंग बदलण्याचा हा निर्णय अत्यंत लाजीरवाणा आणि अनाकलनीय आहे. भारतीय क्रीडा जगतात आपल्या संघाची ओळख ही नेहमीच ‘मेन इन ब्लू’ अशी राहिलेली आहे. मी स्वत: अनेक वर्षे अत्यंत अभिमानाने आणि सन्मानाने ती निळी जर्सी परिधान करून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जगभरातील चाहतेही भारतीय खेळाडूंना निळ्या रंगातच पाहू इच्छितात. मग अचानक या जर्सीचा रंग भगवा करण्यामागे नेमके काय तर्कशास्त्र (लॉजिक) आहे? असा संतप्त सवाल त्याने केला. जर्सीच्या रंग बदलाचे हे प्रकरण आता केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता ते राजकीय पटलावरही पोहोचले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांनी या वादावर भाष्य करताना केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्या म्हणाल्या, खेळाडूं्च्या जर्सीचा रंग बदलणे असो किंवा देशाच्या शिक्षण धोरणातून इतिहास बदलण्याचा चाललेला जाणीवर्पूक प्रयत्न असो, सत्तेत बसलेले लोक नेमके काय करत आहेत हे देशातील आजच्या सुजाण तरुणांना स्पष्टपणे समजते आहे. भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ आता त्यांच्या पारंपरिक निळ्या रंगाऐवजी भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. हॉकी इंडियाने सोशल मीडियावर या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. हा रंग शौर्य, त्याग आणि विजयाचे प्रतीक असून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जर्सीच्या या रंगावरून काही माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने या वादावर स्पष्ट भाष्य केले आहे. आम्ही या बाहेरील चर्चांकडे अजिबात लक्ष देत नाही. आमचे पूर्ण लक्ष सामन्यावर आणि कामगिरीवर असते. नव्या जर्सीत एक सामना खेळल्यानंतर मैदानात संघातील खेळाडूंना पटकन ओळखणे आणि त्याच्यासोबत समन्वय साधणे अधिक सोपे जात असल्याचे त्याने म्हटले आहे. हा निर्णय संघ, मुख्य प्रशिक्षक आणि प्रशासनाने मिळून घेतलेला तांत्रिक निर्णय आहे. यात कोणताही राजकीय किंवा बाहेरील दबाव नाही असे हरमन म्हणाला. हॉकी इंडियाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. तांत्रिक आणि गरजेनुसार याआधीही अनेकदा जर्सीचे रंग बदलण्यात आले आहेत. एकूण काय, ‘जर्सी तेरा रंग कैसा?’ या प्रश्नाचे उत्तर ‘जिसमें मिलाए वैसा’ असेच दिसते, तेव्हा ‘खेलो इंडिया खूब खेलो’ असेच म्हणावे लागेल!

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news