17.7 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeसोलापूरजलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनसुविधा उपलब्ध होण्यास मदत

जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनसुविधा उपलब्ध होण्यास मदत

 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले

सोलापूर : राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तलावांतून गाळ काढण्यात आल्याने सुमारे ८७३.५० कोटी लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता वाढून वाढलेल्या भूजलातून शेतीला सिंचनसुविधा उपलब्ध होण्यास मदत झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.

सन २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार
अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. पहिल्या पाच वर्षात जलयुक्तमधून अति टंचाईग्रस्त गावांमध्ये अभियान राबवून भुजल स्तरवाढविण्यावर भर देण्यात आला. यातून नदी, नाल्यातील अतिक्रमण काढून खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले.
यामध्ये एकूण १२५ जलसाठ्यांमधून ८७.३५ लाख घनमीटर इतका गाळ काढून अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तो टाकला आहे. गाळ काढल्यामुळे साधारणतः ८७३.५० कोटी लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे.

जलयुक्तमधील १६५ गावांतील तीन हजार ५७२ कामांसाठी ९५ कोटी१४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. शासनाकडून ८.५० कोटी निधी प्राप्त झाला आहे.
या अभियानांतर्गत मार्च २०२५ अखेर नऊ कोटी ९६ लाखांची १११ कामे पूर्ण केली जाणार आहेत. गाळ काढण्यात आल्याने पाणीसाठा उपलब्ध झाल्याने कृषी सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०२३-२४ व २४-२५शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील १६५ गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांकडून जलसंधारणाची कामे प्रस्तावित करून ही गावे जलयुक्त केली जाणार आहेत.असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR