25.8 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्यात कापूस लागवडीस प्रारंभ

जळकोट तालुक्यात कापूस लागवडीस प्रारंभ

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे अगोदरच जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा आहे आणि आता तालुक्यामध्ये दोन दिवसापासून पाऊस पडत आहे . दि १० मे च्या रात्री तालुक्यांत चांगला पाऊस झाला तसेच ११ मे रोजी सकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा झाला असून अनेक शेतकरी आता कापसाची लागवड करीत आहेत .

कापसाची लागवड ही मृग नक्षत्रामध्ये महत्त्वाची मानली जाते. मृग नक्षत्रात लागवड केलेला कापूस चांगला येतो तसेच उत्पन्नही चांगले होते, अशी शेतक-यांची धारणा आहे. यामुळे बहुतांश शेतकरी हे मृग नक्षत्रामध्येच कापसाची लागवड करतात. कधी कधी पाऊस नसल्यामुळे शेतक-यांना जूनच्या अखेरीस कापूस लागवड करावा लागला परंतु यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे शेतक-यांनी कापूस लागवडीला प्राधान्य दिले आहे. जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसरामध्ये शेतकरी ही मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. जमिनीमध्ये जास्तीचा ओलावा झाल्यामुळे सध्या शेतक-यांना पेरणी करता येणे अशक्य आहे. सध्या जास्तीचा पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचा औत तसेच ट्रॅक्टरी शेतामध्ये चालत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मृग नक्षत्रामध्येच शेतकरी हे महत्त्वाचे कडधान्य समजले जाणा-या मूग आणि उडदाची पेरणी करीत असतात आता पावसाने थोडी उसंत दिल्यास शेतकरी हे पेरणी करणार आहेत .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR