जळकोट : प्रतिनिधी
जळकोट नगरपंचायत निवडणुकीत नागरिकांना विकासाच्या बाबतीत जी आश्वासने दिली होती ती दोन वर्षात पूर्ण केली आहेत. शहरातील नागरिकांना आता वेळेवर पाणी मिळत आहे. शहरात महा पुरुषांचे पुतळे करण्यात आले आहेत. विविध समाजासाठी सभागृह उभारण्यात आले आहेत. यासोबतच शहरांमध्ये अनेक मूलभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. जळकोट शहरातील २०० कुटुंबांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत., येणा-या शहराच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जळकोट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर २०० घरकुलांचे कार्यारंभ आदेश वाटप जळकोट नगरपंचायतच्या वतीने दि १० रोजी करण्यात आले. यावेळी प्राथमिक स्वरूपामध्ये काही लाभधारकांना घरकुलाचे कार्यारंभ आदेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, नगरसेवक संदीप डांगे, सौ . वर्षा सचिन सिद्धेश्वरे, अॅड तात्या पाटील, अश्वीनी महेश धुळशेट्टे, शिवंिलंग बोदले, सुरेखा गवळे, विनायक डांगे, सुमन त्र्यंबक देशमुख, रेखा बाळू देवशेट्टे , मिनाक्षी ओमकार धुळशेट्टे, खादर लाटवाले , सी. एम . कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभियंता चिरके, सरुबाई चव्हाण, अखतर बागवान यांच्यासह अनेक कर्मचा-यानी परीश्रम घेतले. यावेळी ओमकार धुळशेट्टे, अभियंता चिरके यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन चंद्रकांत कांबळे यांनी केले तर आभार गोंिवद भ्रमना यांनी मानले.