40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरजळकोट येथे झाडावर पडली वीज, कडबा जळून खाक

जळकोट येथे झाडावर पडली वीज, कडबा जळून खाक

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच परिसरामध्ये सलग तिस-या दिवशी विजेच्या कडकडाळासह हलक्या पावसाच्या सरी बरसल्या, जळकोट शहरातील माजी सैनिक वीरभद्र विश्वनाथ कमलापुरे यांच्या शेतामधील कडुंिलबाच्या झाडावर वीज पडली. यामध्ये झाडाखाली ठेवलेला एक हजार कडबा जळून खाक झाला तर हिरवेगार असणा-या कडुंिलंबाच्या झाडालाही पेट घेतला .
जळकोट शहरांमध्ये दि ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान विजेच्या प्रचंड अशा कडकडाटासह हलक्या पावसाला सुरुवात झाली. जळकोट शहराजवळ वीज पडल्याचा मोठा आवाज आला परंतु ही वीज शेतकरी विरभद्र विश्वनाथ कमलापुरे यांच्या शेतामध्ये असलेल्या कडुंिलबाच्या झाडावर पडली. यामध्ये सदरील शेतक-याचा १००० कडबा जाग्यावर जळून गेल्यामुळे सदरील शेतक-याचे मोठे नुकसान झाले. याच झाडाखाली पंधरा मिनिटांपूर्वी दोन बैल तसेच शेतकरी थांबले होते  परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर बैलाला पक्क्या शेडमध्ये बांधण्यात आले  यामुळे  जीवित हानी झाली नाही. विज पडल्याची माहिती सदरील शेतक-याने जळकोट सज्जाचे तलाठी धुपे यांना दिली .
जळकोट शहरातील अशोक कारभारी यांच्या वाळलेल्या आंब्यावर दि ९ एप्रिल रोजी वीज  पडली होती यामध्ये आंबा जळून खाक झाला. या दिवशीही कुठलीही जीवित हानी झाली नाही. सध्या अवकाळी पाऊस तसेच वीज पडण्याचे प्रमाण वाढले असून , हवामान विभागाने दोन-तीन दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा दिला असून  पाऊस व विजेचा कडकडाट होत असताना झाडाखाली अथवा उघड्या जागेवर कोणीही थांबू नये , पक्या निवा-यामध्ये थांबावे, आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR