17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजवानाने ‘दृश्यम’ स्टाईल केली गर्लफ्रेंडची हत्या

जवानाने ‘दृश्यम’ स्टाईल केली गर्लफ्रेंडची हत्या

नागपूर : प्रतिनिधी
लष्करात कार्यरत असलेल्या विवाहित जवानाने त्याच्या गर्लफ्रेंडचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह जंगलात पुरला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपी जवानाला अटक करण्यात आलीय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजय वानखेडे याची ज्योत्सना आकरे हिच्याशी ओळख झाली होती. ज्योत्सनाचा घटस्फोट झाला होता. तिने दुस-या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. अजयने ज्योत्सना ऐवजी १९ मे रोजी दुस-या मुलीशी लग्न केले. ही गोष्ट त्याने ज्योत्सनाला सांगितली नाही. २८ ऑगस्टला ज्योत्सना मैत्रिणीकडे गेली होती. तिथून ती घरी परतलीच नाही. मैत्रिणींनी सांगितले की, रात्री ती फोनवर बोलण्यासाठी गेले त्यानंतर आली नाही.

नातेवाईकांनी ज्योत्सनाचा बराच शोध घेतला पण ती सापडली नाही. अखेर १७ सप्टेंबरपर्यंत तिचा शोध घेतला. शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या मोबाईलचे डिटेल्स तपासले असता लोकेशन हैदराबाद ते नागपूर असे दिसले. मात्र, मोबाईलचे लोकशन कळू नये म्हणून एका ट्रकमध्ये तो टाकला होता. तो ट्रक हैदराबादला जाऊन पुन्हा नागपूरला आल्यानंतर ट्रकचालकाला सापडला. ट्रक चालकाने त्यातले सीम काढून दुसरे सीम घातले होते. मोबाईल फोन ट्रेस झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाची चौकशी केली.

अजयने ज्योत्सनाला भेटायला बोलावल्यानंतर तिला एका निर्जन स्थळी नेले. तिची हत्या केल्यानंतर कपडे काढून मेणकापड आणि प्लास्टिकमध्ये मृतदेह गुंडाळला. त्यानंतर सिमेंटने फ्लोअरिंग केले. तिचे कपडे इतरत्र फेकून दिले. मोबाईल फोनच्या सीडीआरमध्ये ज्योत्सना बेपत्ता झाली तेव्हा अजयसोबत बोलल्याचे आढळले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने गाडी बाहेरून आणि आतून सुद्धा धुतली असल्याचे समोर आले. शेवटी पोलिसांचा संशय बळावल्यानंतर त्याची कसून चौकसी करण्यात आली. अखेर मृतदेह पुरलेली जाता त्याने दाखवली.

ज्योत्सनाची आणि अजयची त्याच्या लग्नानंतर मेडिकलमध्ये भेट झाली होती. त्यावेळी ज्योत्सनाने त्याच्या आईला प्रेमसंबंधांबाबत सांगितले होते. तसंच याच्याविरोधात पोलिसात तक्रार करेन अशी धमकी दिली होती. यामुळेच अजयने ज्योत्सनाची हत्या केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR