लातूर : प्रतिनिधी
९९५ जेष्ठ कलावंतांच्या यादीतील त्रूटी दूर करण्यासाठी निवड समितीने यादी तालुका स्तरावर पाठवली होती. सदर यादीची छानणी करून आणि त्रूटी दूर करून ती एप्रिल अखेर पर्यंत सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या प्राप्त यादी नुसार नुकत्याच आठ दिवसापूर्वी ३०० कलावंतांच्या नावावर अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मोहर उमटली. तरीही जेष्ठ कलावंतांच्या यादीवरून समितीचे सदस्य अद्याप यादीतील नावावरून कथ्याकूट करत आहेत. कलावंतांची यादी मंजूर होऊनही कागदपत्रांच्या अपूर्तीचे तांत्रीक कारण पुढे केले जात आहे. मग याद्या तालुका स्तरावर कशासाठी पाठवल्या होत्या, अशी चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलाकार सन्मान योजनेतंर्गत कलावंत निवडीसाठी जिल्हा वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजना निवड समितीच्यावतीने २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षाच्या कालावधीतील निवड प्रक्रीयेसाठी जिल्हयातील साहित्यीक व कलावंतांकडून प्राप्त अर्जाची छाननी होऊन कलावंतांनी भारूडे, गवळण, अभंग सादर करून आपल्या कलेचे सादरीकरण केले.
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलाकार सन्मान योजनेतंर्गत कलावंतांची निवडीसाठी ९९५ अर्ज निवड समितीकडे प्राप्त झाले होते. सदर अर्ज पुन्हा तालुका स्तरावर छानणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अर्ज लातूर तालुक्यातून ३१७ प्राप्त झाले होते. तसेच औसा तालुक्यातून १७०, निलंगा तालुक्यातून ६६, उदगीर तालुक्यातून ८३, अहमदपूर तालुक्यातून १४०, रेणापूर तालुक्यातून १३४, चाकूर तालुक्यातून ७३, शिरूर अनतपाळ तालुक्यातून २०, देवणी तालुक्यातून ५८, तर जळकोट तालुक्यातून १४ अर्ज प्रास्त झाले होते. सदर अर्ज त्रूटी दूर करण्यासाठी पुन्हा तालुका स्तरावर पाठले होते. सदर अर्जाचया कागदपत्रांची छानणी करून पुन्हा निवड समितीकडे प्राप्त झाले.