25.3 C
Latur
Friday, May 30, 2025
Homeराष्ट्रीयज्योती मल्होत्राच्या मोबाईल मधील डेटा अखेर रिकव्हर

ज्योती मल्होत्राच्या मोबाईल मधील डेटा अखेर रिकव्हर

कर्नाल : वृत्तसंस्था
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. चौकशीदरम्यान हरियाणा पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले. फॉरेन्सिक तपासणीनंतर पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास खूप मदत करू शकतात.

पोलिसांनी ज्योती मल्होत्राकडून तीन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला, जे डिजिटल फॉरेन्सिक तपासणीसाठी कर्नालमधील मधुबन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा आणि कॉल डिटेल्स परत मिळाले आहेत, परंतु लॅपटॉपमधील डेटा अद्याप प्रलंबित आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हर केलेल्या डेटामधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित पीआयओ (पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह) सोबत झालेल्या संभाषणाचे पुरावे समोर आले आहेत. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित असलेल्या दानिशचं नावही समोर आलं आहे, जो दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे प्रकरण फक्त हरियाणा पोलिसांपुरते मर्यादित नाही. आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पोलीस पथकं हिसारला पोहोचली आहेत आणि ज्योतीची चौकशी केली आहे. ज्योतीने तिच्या यूट्यूब चॅनलवर ज्या ठिकाणांचे व्हिडीओ अपलोड केले होते त्या सर्व ठिकाणांची माहिती गोवा आणि यूपी पोलिसांनी घेतली आहे. तिने व्हिडीओ का शूट केला, ते कोणाला पाठवले आणि त्यामागचा उद्देश काय होता याता तपास केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR