लातूर : प्रतिनिधी
प्रभुराज प्रतिष्ठान व लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा न्यायलंय परिसरात झाडानां येळणी बांधून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. कडक्याच्या उन्हात पक्ष्याची पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड व भटकंती होऊ नये या करिता एक सामाजिक बांधिलकी जपून पक्ष्यांची सोय करण्यात आली. तसेच सध्या पाणी टंचाई भासू नये याकरिता पाणी जपून वापरा आणि पाणी आडवा पाणी जिरवा या संदेशाने पाणीचे जतन करून उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही या करिता जनतेने पाण्याचा अपव्यय व गैरवापर टाळुन त्यातून मुक्या प्राणी व पशु पक्ष्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल याची काळजी घ्यावी.
या उपक्रमाणे पशु पक्ष्याची कडक्याच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल चला पाणी वाचवा…जीवन वाचवा…पाणी हे विश्वातील सर्वात मोठी संपत्ती आहे. हे निसर्गाने निर्माण केली असल्याने त्याचे वापर काटकसरीने करूया.. थेंब थेंब पाणी वाचवा आणि संपूर्ण सजीव सृष्टी वाचवा ही जावाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील, प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अजय कलशेट, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष महेश बामनकर, जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे, अधीक्षक ऐ. जी. मेनकुदळे, प्रबंधक बी. के. राऊत, अॅड. सुरेश सलगरे, अॅड. कल्पना भुरे, अॅड. सविता मोतीपवळे, अॅड. सादिक शेख, अॅड. एस. एस. बिराजदार आदी उपस्थित होते.