टँकर- दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण जागीच ठार

परभणी : भरधाव वेगाने जाणा-या इंधन टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा ठार झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास परभणी-गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाट्याजवळ घडली. या घटनेनंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

याबाबत माणिक आप्पाराव कदम यांनी फिर्याद दिली आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, डिगांबर पिराजी कदम (वय २५) हे दुचाकी क्रमांक (एमएच १४ ईटी ६३३१) वरून सिंगणापूरकडे जात होते. ते तिरुपती पेट्रोल पंप परिसरात आले असता परभणीहून गंगाखेडकडे भरधाव वेगाने जाणा-या इंधन टँकरने क्रमांक (एमएच ४४ एजे ७४७७) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डिगांबर कदम गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच ठार झाले.

या प्रकरणी टँकर चालक लहुकुमार धोंडिबा पुरी याच्याविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत, पोलीस अंमलदार विठ्ठल कुंडगीर व आशुतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी महामार्गावर गर्दी जमा झाल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुने रांगा लागल्या होत्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51

Latest news