लातूर : प्रतिनिधी
उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम शहराच्या उत्तर परिसरात सुरू असल्याने दि. ९ ते दि. २३ फेब्रुवारी या दरम्यान टप्या-टप्याने वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. तरी वीजग्राहकांनी सदरील दिनांकाची व वेळेची दखल घ्यावी असे महावितरण कडून कळवले आहे.
दि. ०९ फेब्रुवारी रोजी ११ केव्ही गांधीचौक वीजवाहिनीवरील लोखंड गल्ली, सराफ लाईन, कामदार रोड, ग्रेन मार्केट, गांधी चौक पोलीस चौकी भाग, गांधी चौक, आझाद चौक, मालपाणी हॉस्पिटल, एसबीआय, एसबीएच बँक, बस स्टँड व बस स्टँड समोरील भाग, चंद्र नगर, जैन कॉम्प्लेक्स, भुई गल्ली, बलेपिर गल्ली, झिंगणअप्पा गल्ली, नावंदर, मच्छी मार्केट, दयाराम रोड, हनुमान चौक, काँग्रेस भवन, पोस्ट ऑफिस, खंडोबा गल्ली, उस्मानपुरा, हमाल गल्ली, बसवेश्वर कॉलेज, पोचम्मा गल्ली, राचट्टे गल्ली या परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील. तर दि. ११ फेब्रुवारी रोजी धायगुडे नगर, सह्याद्री अपार्टमेंट, कृष्णाई अपार्टमेंट, दत्तसहवास सोसायटी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील. दि. १५ फेब्रुवारी रोजी बनसोडे नगर, काशिलीन्गेश्वर नगर, देवगिरी नगर, भक्ती नगर, तिरुपती नगर, बेम्बलकर नगर, होळकर नगर, पठाण नगर, नंदधाम सोसायटी, आर्वी गाव,
साई रोड सर्व भाग, चांदतारा मज्जीद सर्व भाग, डॉक्टर कॉलनी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील. दि. १६ फेब्रुवारी रोजी नवजीवन टायर्स भाग, स्वामी विवेकानंद कॉलेज भाग, गंगा पाईप्स भाग, लोकमत, ४ नं बस स्तोप भाग, पी.व्ही.आर भाग, एमआयडीसी उद्योग मित्र, ५ नंबर चौक, पोलीस चौकी भाग आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील. दि. २३ फेब्रुवारी रोजी सुभाष चौक, हत्ते कॉर्नर, तापडिया मार्केट, भुसार लाइन, दयाराम रोड, कापड गल्ली, गांधी मार्केट, लाहोटी कंपाउंड आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील. तरी वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.