15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाची मालिकेत आघाडी

टीम इंडियाची मालिकेत आघाडी

हरारे : वृत्तसंस्था
भारताने आपल्या विजयाची लय कायम राखत तिस-या टी २० सामन्यात दमदार विजय साकारला. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने १८२ धावांचा डोंगर रचला होता. झिम्बाब्वेचा संघ १८३ धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरला, त्यावेळी सुरुवातीपासूनच त्यांना भारताच्या गोलंदाजांनी धक्के दिले आणि त्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर २३ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने टी २० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. डिऑन मेअर्सने यावेळी अर्धशतक झळकावले. पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला झोकात सुरुवात करून दिली. यशस्वीने पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. त्यामुळे यशस्वी आता मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण यशस्वीने यावेळी एक मोठी चूक केली. यशस्वी रीव्हर्स स्विप मारायला गेला आणि आपली विकेट गमावून बसला. यशस्वीने यावेळी २७ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्या फलंदाजीला आलेला अभिषेक शर्मा १० धावाच करू शकला. पण त्यानंतर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची चांगलीच जोडी जमली. गिलने यावेळी ४९ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६६ धावांची खेळी साकारली. पण गिलपेक्षा ऋतुराजचा स्ट्राइक रेट जास्त होता. कारण ऋतुराजने फक्त २८ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावा केल्या. त्यामुळेच भारताला १८२ धावांपर्यंत मजल मारता आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR