26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाचे फ्लोरिडातील सराव सत्र रद्द

टीम इंडियाचे फ्लोरिडातील सराव सत्र रद्द

शुभमन गिल, आवेश खान परतणार भारतात

फ्लोरिडा : फ्लोरिडामध्ये आज होणारा सराव भारतीय संघाला पावसामुळे रद्द करावा लागला. लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर शनिवारी टीम इंडियाचा सामना कॅनडाशी होणार आहे. रोहित शर्मा आणि कंपनीने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील त्यांचे सर्व सामने आतापर्यंत जिंकले आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानचा सहा धावांनी आणि अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करत सुपर-८ मध्ये प्रवेश केला.

भारताच्या कॅनडाविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यानंतर शुभमन गिल आणि आवेश खान संघ सोडणार असल्याचेही मीडिया रिपोर्टस्मध्ये समोर आले आहे. यामुळे दोघेही भारतात परततील. दोघेही भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून अमेरिकेला गेले आहेत. त्याचवेळी खलील अहमद आणि रिंकू सिंग हे इतर दोन राखीव खेळाडू संघासोबत राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR