29.5 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeराष्ट्रीयटॅँकरचा व्हॉल्व तुटल्याने जयपूरमध्ये वायूगळती

टॅँकरचा व्हॉल्व तुटल्याने जयपूरमध्ये वायूगळती

जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थानची राजधानी जयपूर येथे गॅसगळतीने घबराट उडाली आहे. जयपूरात विश्वकर्मा परिसरातील कार्बन डाइऑक्साइड गॅस गळतीने अनेकांनी गुदमरल्याच्या तक्रारी केल्या आहेत. येथील अजमेरा गॅस प्लांटमध्ये कार्बन डाइऑक्साइडची गळती झाली. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर सिव्हील डिफेन्स आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या गाड्या घटनास्थळी रवाना पोहोचल्या आहेत.

या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. सर्वत्र धूर पसरल्याचे भयावह दृश्य दिसत आहे. पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी प्रकल्पात जाऊन गॅस लिकेज बंद करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ही दुर्घटना टँकरचा व्हॉल्व तुटल्याने घडल्याचे म्हटले जात आहे. विश्वकर्मा पोलिस ठाण्याने मेन व्हॉल्व बंद करून गॅसची गळती बंद केली आहे. या गॅसगळतीने रस्त्यावर दृश्यमानता घटली आहे. त्यामुळे वाहनांना हळू चालविण्याचे आदेश देण्यात आले.

कार्बन डायऑक्साईड गॅस प्लांटमध्ये उभे असलेल्या टँकरमध्ये सुमारे २० टन गॅस भरला होती. मंगळवारी सायंकाळी ४:०० वाजता टँकरचा व्हॉल्व अचानक तुटला, त्यामुळे वायू गळती होऊन २०० ते ३०० मीटरपर्यंत गॅस पसरला. घटनास्थळावर पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या टीमने दाखल होत पाण्याचा फवारा केला. आणि प्लांटच्या मुख्य व्हॉल्वला बंद केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी जयपूर येथील अजमेर हायवेवर भांकरोटा जवळ गॅस टँकर दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रदेशात वाहतूकी संदर्भातील नियम कठोरपणे पाळले जात आहेत. जयपूर-अजमेर हायवेवर झालेल्या दुर्घटनेनंतर काही दिवसांनी जयपूर येथे मिथेन गॅसचा टँकर उलटल्याची घटना घडली होती. आणि आता जयपूरमध्ये गॅस फिलींग प्लांटमधून गळती झाल्याची घटना समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR