25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांचा पक्ष होणार सहभागी : सुप्रिया सुळे

ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांचा पक्ष होणार सहभागी : सुप्रिया सुळे

नागपूर : प्रतिनिधी
भाषेचं शिक्षण केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ज्ञ यांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणे योग्य ठरणार नाही, असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

मुंबईत होणा-या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चात शरद पवार यांचा पक्ष सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठीच्या संदर्भात ५ जुलै रोजी आयोजित मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून कोण मोर्चात सहभागी होणार आहे, हे आज किंवा उद्या स्पष्ट केले जाईल, असेही त्या म्हणाल्या. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आमच्यासमोर सर्व लोकांच्या भावना ऐकून घेण्याची जबाबदारी असते. हीच लोकप्रतिनिधीची खरी ताकद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR