27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासले काळे

ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासले काळे

मराठी पाट्या न लावल्याने मनसे आक्रमक

ठाणे : दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली २५ नोव्हेंबरची मुदत संपली असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहका-यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. जर दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाही तर मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक् करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे.

मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यांसंदर्भात मनसेने आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरूमला काळे फासले आहे. मनसे पुढील काही दिवसांत आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसांत आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

केस दाखल करणार : केसरकर
मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, दुकानांना मराठी पाट्या असणे आवश्यकच आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुरेशी मुदतही दिली आहे. जे करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जे काळं फासतील त्यांच्याविरोधात केस दाखल करण्यात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR