17.8 C
Latur
Wednesday, January 21, 2026
Homeमहाराष्ट्रमराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक

पुणे : मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात मनसेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. शहरातील जंगली महाराज रोडवर हे आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्या वर कायदेशीर कारवाई करावी याबाबत महानगरपालिकेला मनसेने पत्रही देण्यात आले आहे. तसेच महापालिकेने मराठी पाट्या बाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा मनेसडून देण्यात आला होता.

जंगली महाराज रोडवरील अनेक दुकानावरती इंग्लिश पाट्या आहेत. जंगली महाराज रोडवर अनेक ब्रॅण्ड, कपड्याची दुकाने असून यांच्या पाट्या मराठीत करा अशी मनसेची मागणी आहे. यावेळी काही दुकानांचे इंग्रजीत असलेले फलक फोडल्याचे देखील पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR