लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हातून श्री. शिवाजी माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय लातूर येथिल मराठी भाषाविषयाचे अध्यापक डॉ. उमाकांत लक्ष्मणराव जाधव यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, राज्य पुणे द्वारा आयोजित केलेल्या नवोपक्रम स्पर्धेतील राज्यस्तरीय चवथ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले
ही स्पर्धा राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड, शिक्षक व मुख्यद्यापकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, राज्य पुणेद्वारा आयोजित केली होती. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत डॉ. उमाकांत जाधव यांचा माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून ‘चला करु पुस्तकांशी मैत्री’ या नवोपक्रमास राज्यस्तरीय चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. याप्रसंगी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यस्तरीय नवोपक्रमात स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ११०० स्पर्धकानी सहभाग नोदविला. यापैकी केवळ ५० स्पर्धकाची निवड करण्यात आली होती. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहसंचालक अनुराधा ओक यांनी मनोगत व्यक्त केले. परिक्षक तथा लेखकं शिक्षणतज्ञ हु न जगताप यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी लातूर जिल्ह्यातून विभागिय संचालक गणपतराव मोरे, उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, डायटचे प्राचार्या डॉ. भगिरथी गिरी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, डॉ. जगन्नाथ कापसे, डॉ. राजेश गोरे, सतिष भापकर, निशिकांत नाडे, मेनकुदळे तालुक्यातील साहाय्यक मिरकले, योगेश्वरी सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक तज्ञ, शिक्षक, विशेष शिक्षक साधन व्यक्ती यांनी डॉ. उमाकांत जाधव यांचे कौतुक केले.