सोलापूर : सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजीशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एसपी न्यूरोसायन्स वळसंगकरांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणा-या एका महिलेला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (रा.सोलापूर) या संशयीत महिलेस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर, सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने या संशयित महिलेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती.
तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. सदर बझारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी ३ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत.
सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीप्रमाणे फिर्यादी डॉ. अश्विन यांनी आरोपी महिलेस वेळोवेळी सहकार्य करून देखील संशयीत आरोपी मनीषा मुसळे फिर्यादींवर खोटे आरोप करून धमकी देत होती. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी या महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वत:च्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वत:च्या परवाना असलेल्या पिस्तूलमधून स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केली आहे. मनीषा मुसळे हिच्यामुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली. अशी तक्रार डॉ अश्विन वळसंगकर यांनी दिली आहे.