लातूर : प्रतिनिधी
भारत देशाच सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी अभ्यासू नेतृत्व पाठवायला हवे, विना अभ्यास लोकप्रतिनिधी असल्यास काय परिणाम होतात हे आपण गेल्या काही वर्षांत पाहत आहोत. यासाठी आपण विचार करुन महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथे आयोजित सुसंवाद बैठकीत बोलतांना केले.
लातुर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी डॉ. शिवाजी काळगे यांच्या समवेत लातुर विधानसभा मतदार संघातील पाखरसांगवी गावास भेट दिली. पांखरसांगवी येथील तात्यासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी ही सुसंवाद बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामस्थ, तरुण युवक, ज्येष्ठ नागरिक त्यांनी यांच्याशी संवाद साधला. या भेटीत पाखरसांगवी सर्कल मधील पाखरसांगवीसह खंडापुर, वासनगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान उपस्थित होते.
पाखरसांगवी ग्रामस्थांनी शेतीमाल बाजारभाव, बेरोजगार युवकांचे प्रश्न, मागील १० वर्षात विद्यमान खासदारांनी गावांसाठी काहीच कामे केली नाहीत या विषयावर ग्रामस्थांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या समोर विचार मांडले. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, देशाच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत, या निवडणुकीत आपल्याला खासदार निवडताना पक्ष, उमेदवार, याचा विचार करावा लागतो. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यातील उमेदवार असायला हवा आणि उच्च शिक्षित, मितभाषी, शांत, संयमी, विश्वास पात्र असे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनातील, असे डॉ. शिवाजी काळगे म्हणजे आपला माणूस, आपला उमेदवार, आपला खासदार होय.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी अभ्यासू नेतृत्व पाठवायला हवे. विना अभ्यासू लोकप्रतिनिधी असल्यास काय परिणाम होतात हे आपण गेल्या काही वर्षांत पाहत आहोत यासाठी आपण विचार करायला हवा. येणा-या काळात या भागातील फुलांची निर्यात परदेशात पाठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारावे लागतील, मालाची निर्यात करण्यासाठी कार्गो विमान सेवा आवश्यक आहे आणि हे सर्व व्हावे यासाठी योग्य उमेदवार आपल्याला निवडून आणावा लागेल आणि ते म्हणजे डॉ. शिवाजी काळगे होय.
सामान्य कुटुंबातुन आपल्या मेहनतीने शिक्षण घेऊन लातुर पॅटर्न मुळे डॉ. शिवाजी काळगे आज गेल्या २५ वर्षपासून लातूरच्या रुग्णाला रुग्ण सेवा देत आहेत असे डॉ. शिवाजी काळगे यांची माहिती आपण प्रत्येक मतदाराला देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राम चामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, निरीक्षक सर्जेराव मोरे, समद पटेल, तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, विजयकुमार साबदे, रमेश सुर्यवंशी, प्रवीण पाटील, तात्यासाहेब देशमुख, रमेश पाटील, संजय पाटील, संजय कैले, अक्षय देशमुख, सोनाली थोरमोटे, साहेबराव देशमुख, काकासाहेब देशमुख, राम चामे, बाबा पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.