22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरडॉ. शिवाजी काळगे यांना व्यापारी मित्रांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावे 

डॉ. शिवाजी काळगे यांना व्यापारी मित्रांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावे 

लातूर : प्रतिनिधी
लातुर लोकसभेचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. ८ एप्रिल रोजी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  शहरातील अंबाजोगाई रोड वरील रियांश ट्रेडर्स स्टील या ठिकाणी व्यापा-यांची सुसंवाद बैठक घेण्यात आली. व्यापारी मित्रांनी डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, आपल्या मतदारसंघात डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या प्रचारार्थ आज आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आलेले आहोत. आपल्या राज्यात आणि देशात काय परिस्थिती आहे, हे आपण आज पाहत आहोत. आज सुरु असलेले फोडाफोडीचे राजकारण सामान्य माणसाला अजिबात आवडत नसून आज लोक प्रतिनिधीची खरेदी विक्री होत असल्याचे आपण पाहतोय  यांचीच चीड जनतेत आहे. शेतक-यांच्या शेत मालाला भाव नाही, वर्षाला २ कोटी नौका-या देणार, असे आश्वासन दिले गेले पण १० वर्षात अशा घोषणांचा केवळ पाऊस पडला प्रत्यक्षात कांही झाले नाही. व्यापा-यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यात जीएसटी सारखे विषय आहेत. एकदा निवडून गेल्या नंतर परत मतदाराकडे वळून पाहिले नाही असे विद्यमान खासदार एकीकडे आहेत तर दुसरीकडे उच्च विद्या विभूषित रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानणारे आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे असून आता आपण विचार करावा व डॉ शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना सर्जेराव मोरे म्हणाले की, लातुर आणि लोकनेते विलासराव देशमुख हे वेगळे नाते आहे, आणि त्यांच्या पावलावर पाउल ठेवून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूरच्या विकासासाठी प्रयत्न करत असून त्यांना साथ देण्यासाठी आपला खासदार म्हणून डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. दरम्यान यावेळी उपस्थित व्यापा-यांनी त्यांच्या समस्या मांडल्या व या दूर करण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले की, आपले उमेदवार म्हणून डॉ. शिवाजी काळगे निवडणूक रिंगणात आहेत, उच्च शिक्षण, मितभाषी आणि स्थानिक उमेदवार असल्याने आपले प्रश्न संसदेत मांडण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे अशी विनंती केली. यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण जाधव, दीपक सुळ, निरीक्षक सर्जेराव मोरे, अभिजित मोहिते, अमर मोहिते, प्रदीप काळे, अरबाज शेख, जयेश पेद्दे, मनोज पाटील, महेश पुरणकर, किरण पाटील, सुनील घोडके, आदिनाथ पवार, अतुल पाटील, गौरव क्षीरसागर, विकास कांबळे, व्यंकटेश पूरी, इसरार सगरे यांच्यासह परिसरातील व्यापारी, नागरिक यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR