30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरविभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडलवार यांच्याकडून इंद्रभुवन इमारतीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडलवार यांच्याकडून इंद्रभुवन इमारतीची पाहणी

सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीची शनिवारी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी पाहणी केली. या इमारतीसाठी वापरण्यात आलेल्या विविध साहित्य व इतर बाबींची त्यांनी संपूर्ण माहितीही अधिकाऱ्यांकडून घेत काही सूचना देखील यावेळी केल्या.

महापालिकेला सदिच्छा भेट देऊन त्यांनी परिसरातील संपूर्ण इमारतीची पाहणी केली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम याचीही त्यांनी पाहणी केली. इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण बाबतची संपूर्ण माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्तांना दिली. याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त ज्योती भगत-पाटील, मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभागाचे राजेश परदेशी, मतीन शेख, संगणक विभागाच्या स्नेहल चपळगावकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची अंमलबजावणी आणि कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील ३०० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे. आदी संदर्भातील माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR