26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमुख्य बातम्या‘ड्रॅगन’चे अमेरिकेविरूद्ध अ‍ॅग्रो टेररिझमचे कारस्थान! धोकादायक जंतूंची तस्करी; दोन संशोधकांना अटक

‘ड्रॅगन’चे अमेरिकेविरूद्ध अ‍ॅग्रो टेररिझमचे कारस्थान! धोकादायक जंतूंची तस्करी; दोन संशोधकांना अटक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
यून्किंग जियान आणि जुनयोंग लियू… ही दोन नावे सध्या अमेरिकेत चर्चेचा विषय बनली आहेत. ३३ वर्षीय जियान आणि ३४ वर्षीय लियू दोघेही चीनचे नागरिक आहेत. ज्यांच्यावर अमेरिकेत एक धोकादायक जंतूची तस्करी करण्याचा आरोप आहे. हे जंतू पिकांमध्ये रोग निर्माण करणारे, मानवी आरोग्यास विविध व्याधींच्या रूपाने हानी पोहोचवणारे आहेत.

या दोघांना षडयंत्र रचणे, अमेरिकेत तस्करी करणे, खोटे जबाब देणे आणि व्हिसा फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटकडून जारी निवेदनात या दोन्ही चिनी नागरिकांवर अमेरिकेत फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम नावाच्या बुरशीजन्य जंतूची तस्करी करण्याचा आरोप आहे. ज्याला वैज्ञानिक कृषी दहशतवादाचे शस्त्र मानतात.

अधिका-यांनी सांगितले की, जियान आणि तिचा बॉयफ्रेंड लियू यांना कथितपणे त्यांच्या रिसर्चसाठी चिनी सरकारकडून निधी मिळत होता. लियू चिनी यूनिवर्सिटीत काम करत होता आणि तिथे तो फ्यूजेरियम गॅमिनीरम यावर रिसर्च करत होता. तपासावेळी सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यानंतर गुन्हा कबूल केला. गॅमिनीरम डेट्रॉयट मेट्रोपॉलिटन विमानतळावरून अमेरिकेत आणण्यात येणार होते. ते मिशिगन यूनिवर्सिटीत लॅबमध्ये यावर रिसर्च करणार होते जिथे त्याची गर्लफ्रेंड जियान काम करत होती. हे दोघेही चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी जोडलेले आहेत.

‘फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम’मुळे
पिके विषारी, सजीवांत रोगराई
फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम एक बायोलॉजिकल रोगजनक म्हणजे एक जैविक जंतू आहे. हा सुक्ष्मजीव असून जो माणूस, प्राणी आणि पिकांसह अन्य सजीवांमध्ये रोग निर्माण करून त्यांना हानी पोहचवू शकतो. कृषी क्षेत्रात गहू, मका, ओट्ससारख्या पिकांना संक्रमित करू शकतो. हा खतरनाक विषाणू आहे, जो पिकांवर रोगराई पसरवतो, त्यानंतर पिक विषारी होते, ते खाण्यासही योग्य नसते. मानव आणि प्राण्यांसाठी ते जीवघेणे ठरू शकते. जर फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम युक्त धान्य कुणी खाल्ले तर त्याला उलटी, यकृताचे नुकसान आणि प्रजनन समस्या उद्भवू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR