लातूर : प्रतिनिधी
श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील मराठी विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. म. ई. तंगावार यांचा ‘विचारवंतांचा मराठवाडा’हा ग्रंथ सायन प्रकाशन, पुणे यांनी ५ जून रोजी प्रकाशित केला. या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या हस्ते झाले.
प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास युनिक फाउंडेशनचे कार्यकारी संचालक, लेखक आणि संशोधक प्रा. विवेक घोटाळे, मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. जयद्रथ जाधव, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. कांत जाधव, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. संभाजी पाटील, वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर येथील मराठी विभागातील समीक्षक डॉ. रवींद्र बेंबरे, उदगीर येथील वाचक संवाद या चळवळीचे प्रमुख अनंत कदम, दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील प्रा. डॉ. राजू मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक आणि लेखकाचा परिचय डॉ. संभाजी पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजू मोरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. रवींद्र बेंबरे यांनी मानले.
















