पुणे : प्रतिनिधी
पुण्यात स्वारगेट परिसरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून दुसरी अत्याचाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका आयटी कंपनीतील तरुणीचा कॅबचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात सलग दुस-या दिवशी महिलेवर झालेल्या अत्याचाराने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता एका कॅबचालकाने आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवासादरम्यान कॅबचालकाने आरशात पाहून विकृत चाळे केले. चालकाने अश्लील कृत्य केल्याने या तरुणीने चालत्या कॅबमधून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर २ किलोमीटर धावत जाऊन ही पीडित तरुणी पोलिस ठाण्यात दाखल झाली. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच कॅबचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.