कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने एसआयआर विरोधात मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बोनगाव येथे एसआयआरचा निषेध करण्यासाठी एक रॅली काढली. त्यानंतर जमावाला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपला आव्हान दिले.
जर भाजपने बंगालमध्ये आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ते संपूर्ण भारतात भाजपचा पाया हादरवून टाकू, असे आव्हान बॅनर्जी यांनी दिले. भाजप आम्हाला राजकीयदृष्ट्या पराभूत करू शकत नाही. भाजप शासित राज्यांमध्ये एसआयआर लागू करण्याचा अर्थ केंद्र सरकारने तेथे घुसखोरांची उपस्थिती मान्य केली आहे का? असा सवाल त्यांनी केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एसआयआर नंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि भाजपने काय केले आहे हे लोकांना कळेल. जर एसआयआर दोन ते तीन वर्षांत झाला तर आम्ही शक्य तितक्या सर्व साधनांनी प्रक्रियेला पाठिंबा देऊ. बिहारमधील निवडणूक निकाल पहा. एसआयआरचा परिणाम असा आहे की विरोधी पक्ष भाजपचा खेळ ओळखू शकले नाहीत. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण भारतात त्यांचा पाया हादरवून टाकेन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले.

