21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरतहसीलच्या कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

तहसीलच्या कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

जळकोट : प्रतिनिधी
महसूल विभागाचा संधारीतआकृतीबंध समितीच्या बहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. अवल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार या पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय शासन स्तरावर अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. यासह विविध मागण्यांसाठी जळकोट तहसीलमधील महसूल कर्मचा-याच्या वतीने काळ्याफिती लावून काम करण्यात आले. दि १० जुलै ते १५ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन करण्यात येणार आहे .
महसूल सहायक व तत्लाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अहर्ताधारी असूनही महसूल सहायक यांचा ग्रेड पे १९ व तलाठी यांचा ग्रेड पे २४०० आहे. त्यामुळे महसूल सहायक यांचा ग्रेड पे २४०० करण्यात यावा.  अव्वल कारकून ऐवजी सहायक महसूल अधिकारी या संवर्गाचे शासन स्तरावरुन नामातंरण करुन पदनाम बदलाबाबत मागणी मंजूर करणे. नायब तहसिलदार संवर्ग हा राजपत्रीत संवर्ग असूनही त्याची वेतनश्रेणी वर्ग तीन संवर्गाची देण्यात आली आहे ती बदल करुन ४८०० ग्रेड पे करण्यात यावा. सर्व जिल्ह्यात शासन धोरणानुसार अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देणेत यावी.
नायब तहलिदार पदासाठी अव्वल कारकून/मंडळ अधकिारी यांचेकरिता पदोन्नती, विभागीय परिक्षा, सरळ सेवा परिक्षा याबाबतचे प्रमाण ७०:१०:२०करण्यास मान्यता देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचा-यांना पदोचती देत असतांना तलाठी संवर्गामध्ये २५ टक्के पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यासाठी महसूल कर्मचा-यांच्या वतीने विविध पातळीवरील आंदोलने करण्यात येत आहेत. जळकोट तहसील कार्यालयातील अनेक विभागाचे महसूल कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR