37.1 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeलातूरतहसीलमधील जनरेटर बनले शोभेची वस्तू 

तहसीलमधील जनरेटर बनले शोभेची वस्तू 

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तहसील कार्यालयामध्ये अनेक नागरिक हे तालुकाभरातून विविध कामानिमित्त येत असतात परंतु जळकोट तहसीलचा वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ण कामकाज ठप्प होत आहे. जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत नागरिकांना तहसील मध्येच थांबावे लागत आहे . या आठवड्यात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होता यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये ताटकळत बसावे लागत आहे.
  तालुक्याच्या ठिकाणचे तहसील कार्यालय म्हटल्यानंतर या ठिकाणी वीज खंडित झाल्यानंतर कार्यालयातील सर्व संगणक सूरु राहतील याची व्यवस्था करणे गरजेचे आहे परंतु आजपर्यंत जळकोट तहसीलमध्ये ही व्यवस्था करण्यात आली नाही . थोडीही लाईट गेली की जळकोट तहसील कार्यालयातील सर्व महत्त्वाचे संगणक बंद पडतात यामुळे कामकाज बंद पडते. जळकोट तहसील कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त तालुकाभरातील शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येतात . वीज पुरवठा सुरळीत असल्यास नागरिकांचे कामकाजही व्यवस्थितपणे होते परंतु वीज खंडित झाल्यास मात्र नागरिकांना वीज येईपर्यंत ताटकळत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही . सध्या विविध योजनेसाठी अपंग तसेच वयोवृद्ध नागरिक तहसीलमध्ये येत आहेत परंतु वीज गेल्यास त्यांना तहसील मध्येच थांबून राहावे लागत आहे .
या आठवड्यामध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित झाला शुक्रवारी तर दुपारपर्यंत  लाईट आली नाही यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. विज नसल्यामुळे कुठलेही काम होऊ शकले नाही.  यामुळे जर का एखादी वेळेस खूप वेळ वीज आली नाही तर पर्यायी व्यवस्था तहसील कार्यालयात असणे गरजेचे आहे असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.  जळकोट तहसील कार्यालयामध्ये गत पाच ते सहा वर्षांपूर्वी मोठे जनरेटर आणून बसविण्यात आले आहे. मात्र हे जनरेटर सुरूच करण्यात आले नाही. एकदा का गुत्तेदाराने हे जनरेटर बसून गेला परत मात्र हे जनरेटर सुरू झाले नाही .लाखो रुपयाचे जनरेटर तहसील मध्ये असताना मात्र याचा उपयोग होताना दिसून येत नाही. यामुळे जळकोट तहसीलमध्ये बसविण्यात आलेले जनरेटर सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR